भुजबळ राष्ट्रवादीतच खूष - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खूष असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान राखलाच पाहिजे, तसेच आमच्याकडे लोक धुऊन घेण्यासाठी वॉशिंग मशिनही नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी भुजबळ यांच्या शिवसेनाप्रवेशाचा विषय टोलावून लावला.

नाशिक - छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खूष असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान राखलाच पाहिजे, तसेच आमच्याकडे लोक धुऊन घेण्यासाठी वॉशिंग मशिनही नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी भुजबळ यांच्या शिवसेनाप्रवेशाचा विषय टोलावून लावला.

देशातील मंदीबाबत भाजपच्या धोरणाकडे बोट दाखवत कुठलेही महत्त्वाचे खाते नसलेल्या शिवसेनेचा देशातील मंदीच्या स्थितीशी अजिबात संबंध नसल्याचा दावा केला. 

ते म्हणाले की, ‘‘ भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या शिवसेनाप्रवेशाविषयी फक्त प्रसारमाध्यमांमध्येच चर्चा आहे.’’ नारायण राणे भाजप, तर भुजबळ शिवसेनेत या चर्चेविषयी राऊत म्हणाले की, भाजपने त्यांच्या पक्षात कुणाला घ्यावे हा त्यांचा प्रश्‍न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhagan bhujbal Happy in NCP Sanjay Raut Politics