'पुरोहितांना 5 हजार तर शेतकऱयांना 50 का नाही?'

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

हिंगोलीः भाजप सरकार पुरोहितांना महिना 5 हजार रुपये देणार आहे. एका घरात 4 जण असतील तर 20 हजार रुपये झाले. असे असेल तर काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50 हजार रुपये महिना का देत नाही?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा हिंगोलीत पोहोचली आहे. वसमतनगर येथे आज (गुरुवार) जाहीर सभा पार पडली. या वेळी बोलताना भुजबळ म्हणाले, 'भाजप सरकारच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. व्यापारी, उद्योजक आत्महत्या करत आहेत. या सरकारच्या काळात हे काय सुरु आहे? शेतकऱ्यांनी चारा व छावण्या मागितल्या आणि यांनी डान्सबार आणि लावण्या दिल्या. गायीला वाचवा आणि बाईला नाचवा, असे हे भाजप सरकार आहे. या देशात बोलण्यावरही बंदी टाकण्याचे प्रयत्न केले जात आहे. घटनेने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मी बोलणार…माझे बोलणे कुणीही थांबवू शकणार नाही.'

ब्राह्मण आरक्षणाच्या मागणीसाठी नुकतेच आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात धार्मिक विधी करणाऱ्या ब्राह्मणांना दरमहा आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याचा दाखला देत भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले, 'योगी नरेंद्रचा एकच नारा.. ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुम्हारा... सध्या चुनावी जुमला चालू आहे. ओबीसी मुलांची शिष्यवृत्ती भरली गेली नाहीच. शिवाय, विकासाचा मुद्दा यांच्याकडे नाही, त्यामुळे जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे कामे होतील. सर्वांनी यापासून सावध रहावे. ज्याने खेळण्यातील विमान कधी बनवले नाही, त्याला राफेल विमान बनवण्याचा काम देण्यात आले.'

'यांना मंदिर नाही तर सरकार बनवायचे आहे. या देशात किती मुर्ख आहेत हे दाखवायचे आहे. परंतु, वाईट याच गोष्टीचे वाटते की यामध्ये सुशिक्षित लोक आंधळे बनत चालले आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी मिळून एकत्र येत आहेत, त्यावर टिका केली जाते. पण तुमच्यासोबत 45 पक्ष असल्याचे तुम्ही सांगता मोदी एकटे आहेत मग हे सोबत कोण आहेत? असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com