भुजबळांना मातोश्रीवर ‘नो एन्ट्री’

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देणाऱ्यांना मातोश्रीवर प्रवेश नाही, अशा आशयाची पोस्टरबाजी शिवसैनिकांनी मुंबईत केली आहे.

सचिन अहिर यांच्यानंतर छगन भुजबळही शिवसेनेत येणार असल्याची बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या आधारावरच शिवसैनिकांनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. विक्रोळी येथील शिवसैनिक रवींद्र तिवारी यांनी शिवसेना भवन समोर, मातोश्री समोर तसेच मुंबईच्या सर्वच प्रमुख चौकात भुजबळांच्या विरोधाचे बॅनर लावले आहेत.बॅनरवर छगन भुजबळ यांचे एक कार्टून असून त्यांना लखोबा लोखंडे संबोधले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal Matoshri No Entry Shivsena NCP Politics