भुजबळ म्हणतात "झाले मोकळे आकाश... ' 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, "होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो. केईएम रुग्णालयात दोन महिन्यांपासून होतो, डॉ. सुपे आणि त्यांच्या सर्व टीमने माझी काळजी घेतली, त्यामुळे जीवघेण्या आजारातून बाहेर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

माध्यमांना उत्तर देताना ते म्हणाले, की आता मी घरात आराम करणार आहे. जास्त "बाईट' देऊ नका, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. असे सांगताना भाजप खासदाराच्या वाक्‍याचा हवाला देत, "महाराष्ट्र सदन बहोत ही सुंदर, लेकीन बनानेवाला अंदर' अशी कोपरखळीदेखील भुजबळ यांनी लगावली. 

दरम्यान, शिवसेने सोबत 25 वर्षांचा घरोबा आहे. अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी माझ्याबाबत चांगल्या भावना व्यक्‍त केल्या. त्याचे समाधान असल्याचेही भुजबळ म्हणाले. तर राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी (10 जून) प्रकृती ठीक असेल तरच उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

प्रकृती सुधारल्यानंतर महाराष्ट्रासह देशभर फिरणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. ""मला जामीन मिळाला त्या दिवशी पहिला फोन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आला होता,'' असेही त्यांनी सांगितले. 

या वेळी भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मिश्‍किलपणे उत्तरे दिली. तुरुंगातील अनुभव कसा होता, असा प्रश्‍न विचारल्यावर ते "जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे', असे भाष्य त्यांनी केले.

Web Title: Chhagan Bhujbal's reaction came out on bail