Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी SIT च्या तपासात मोठी अपडेट

किऱ्हाडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी, जमावाने किराडपुरा भागात पोलिसांची वाहनं जाळली, काही खासगी वाहनांवर आणि परिसरात दगडफेक केली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर जाळपोळ आणि हाणामारी झाली. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. (Chhatrapati Sambhajinagar rumours Clash Broke Out Between Two Groups update SIT investigation)

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी एसआयटी पथकाची स्थापना केली होती. दरम्यान एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अफवांमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुरुवातीला दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांनी हा वाद मिटवला देखील होता. मात्र त्यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावरुन अफवा पसरवल्या आणि त्यामुळे मोठा जमाव किराडपुरा येथे जमा झाला.

"एका गटाच्या तरुणांना नाहक मारण्यात आले आहे, मारेकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात लपवून ठेवले आहे, शहागंजमध्ये दंगल उसळली आहे," यासह काही अफवा पसरल्यानेच छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला. अशी माहिती एसआयटीच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे आता अफवा पसरवणाऱ्या लोकांचा शोध पोलीस घेत आहेत.

रामनवमीच्या आदल्या रात्री शहरातील किराडपुऱ्यात दोन गटात वाद झाला होता. या घटनेला 25 दिवस उलटले असून, पोलिसांकडून अजूनही फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर आतापर्यंत एसआयटीने 79 हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com