'शिवराज्याभिषेक महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण'

Uddhav-Thackeray
Uddhav-ThackerayFile Photo

मुंबई : युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांना शिवराज्याभिषेक (shivrajyabhishek) दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackreay) यांनी आज (रविवार) त्रिवार मुजरा करुन राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंनी छत्रपती शिवराय यांचा शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण असल्याचे म्हटले आहे. दरम्यान शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येत आहे. (chhatrapati-shivaji-maharaj-shivrajyabhishek-uddhav-thackreay-wish-citizens-maharashtra-news)

शिवराज्याभिषेक दिना निमित्त जनतेस दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले.

Uddhav-Thackeray
शिवाजी महाराजांचं राज्य 'रयतेचं' कसं झालं? 'या' आज्ञा देतात त्याचं उत्तर

प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे. या दिनानिमित्त शुभेच्छा देताना छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com