विधिमंडळात घुमला शिवरायांच्या घोषणांचा 'आव्वाज'

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभा पटलावर मांडले. त्यानंतर मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकाला सभागृहात मांडल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजूरी दिली आहे. विखे-पाटील यांनी ही घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा असल्याचे सांगितले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहाबाहेर सर्वांनीच जल्लोष सुरु केला.

दरम्यान, 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणांच्या आवाजात सभागृह दणाणून सोडला. 
 

Web Title: Chhatrapati Shivaji Maharajs Jai announcement in Assembly Maratha Reservation Issue