
Eknath Shinde : सर्व मागण्या मान्य करतो, आता लाँगमार्च थांबवा; मुख्यमंत्र्यांचं गावितांना आवाहन
मुंबईः शेतकरी, कष्टकरी, अंगणवाडी सेविका यांचा एक लाँगमार्च मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आज सभागृहात बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य असल्याचं म्हटलं असून मार्च मागे घेण्याची विनंती केली आहे.
शेतकऱ्यांचा मार्च ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. शिष्टमंडळासमोब मुख्यमंत्र्यांनी चर्चादेखील केली. मुख्यमंत्री सभागृहात बोलतांना म्हणाले की, कांद्याला ३०० ऐवजी ३५० रुपये अनुदान देण्यात येईल. तसेच आंदोलकांच्या बहूतांश मागण्या मान्य आहेत. त्यामुळे गावित यांनी लाँग मार्च थांबवावा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली.
हेही वाचाः ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
दरम्यान, शेतकरी, कामगार, अंगणवाडी सेविका यांच्या मागण्यांसाबबत एक समिती गठीत करण्यात आलेली असून महिन्याभरात समितीने अहवाल द्यावा, असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य असून मार्च थांबवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
सोमवारपर्यंत जिथे आहे तिथेच थांबू, असा निर्णय मोर्चेकऱ्यांनी घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन सादर करावं, अशीही मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती. आता मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर केलं असून मोर्चेकरी काय निर्णय घेतात, हे पाहावं लागेल.