
Sharad Pawar : शरद पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले...
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवास्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे परदेशात आहेत. दरम्यान शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला आले आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार यांची भेटी केवळ सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. २४ जूनला मराठा मंदिर संस्थेचा अमृत महोत्सव आहे. याच कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला शरद पवार आले होते.
मराठा मंदिर संस्थेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शरद पवार निमंत्रण द्यायला आल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पवार हे पहिल्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने राजकीय अर्थ काढले जात आहेत. या दोघांमध्ये ४० मिनिटे चर्चा झाली आहे.