
Eknath Shinde : 'समृद्धीप्रमाणचं मुंबई सिंधूदुर्ग महामार्ग करणार', मुख्यमंत्र्यांचं सिंधुदुर्गच्या जनतेला मोठं आश्वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनतेला संबोधताना मोठं वक्तव्य केलं आहे. सावंतवाडीसाठी ११० कोटींचा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी कुणी दिला नसेल इतका निधी या सरकारनं दिला. तसेच, विदेशी गुंतवणुक परदेशात आणणार पहिलं राज्य. असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. (Chief Minister Eknath Shinde on Sindhudurg visit big statement )
शासन आपल्या दारी योजनाचा चौथा कार्यक्रम सावंतवाडी येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. केंद्रीय योजनांचा कोकणाला लाभ मिळवून देणार. राणेंच्या खात्याच्या योजनांना कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
सावंतवाडीला आम्ही अभूतपुर्व निधी दिला आहे. हे सर्वसामान्यांच सरकार आहे. कोकणात ३ क्रीडा संकुल बांधण्याचा प्रयत्न करण्यात येणार. राणे, केसरकर अनेक योजना आणत आहेत. केसरकर यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. राणेंसोबात माझी काल तीन तास बैठक पार पडली. पर्यटन वाढीसाठी लागणार निधी देणार. जगाला हेवा वाटलं असं कोकण बनवणार.
केंद्राकडे मागितलेली १०० टक्के रक्कम मंजूर होते. दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुप कौतुक झालं. महाराष्ट्राला केंद्राचं संपूर्ण पाठबळ आहे. राज्यात १ लाख १४ हजार कोटींची परदेशी गुंतवणुक केली आहे. विदेशी गुंतवणुक परदेशात आणणार पहिलं राज्य. MMRDA च्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण करण्यात येणार.
समृद्धीप्रमाणचं मुंबई सिंधूदुर्ग महामार्ग करणार. असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिलं.
राणेंसोबत बैठक
काल आमची बैठक झाली. राणे यांचं कोकणावर प्रेम आहे. राणेंच्या मोठ्या योजना आहेत. महिण भगिणी आणि तरुण वर्गाला काम मिळण्यासाठी राणे यांनी अनेक योजना आख्यल्या आहेत. याची काल माहिती राणे यांनी बैठकीमध्ये दिली. ३ तास ही बैठक झाली.
बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा. मी तुम्हाला खात्रीपुर्वक सांगतो की, राणे यांच्या विभागाच्या माध्यमातून आपण हजारो लाखो नोकरी देणारे हात निर्माण करु शकतो. असं मोठं आश्वासनदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिलं.