
Eknath Shinde : पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख; एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
मुंबईः जळगावच्या पाचोरा येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी फकिरीची भाषा करुन एकेरी उल्लेख केला. त्याला एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिलं आहे.
कालच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
बोलतांना उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीचं समर्थ केलं. ते म्हणाले की, वैशालीताई आर.ओ. तात्यांचं काम घेऊन पुढे जात आहेत. ते म्हणतील ही घराणेशाही आहे. असेल. पण घराणेशाहीतही घराण्याची परंपरा असते. अरे तुला आगे ना पिछा. तुला कोणी नाही. झोळी घेऊन निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देशील, त्याचं काय करायचं. जनता भिकेला लागेल,त्यांचं काय?
हेही वाचाः Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
'घराण्याची परंपरा असते. सगळे तिकडे लोभासाठी जात असतांना वैशालीताई तुम्ही लढण्यासाठी इथे आहात. आता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. निवडणूक आली तर वैशालीताईंच्या पाठिशी तुम्हाला उभं राहावं लागेल. पाचोऱ्यात गद्दाराला गाडावं लागेल.' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता टीका केली.
एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये नेतृत्व सिद्ध केलं आहे. संपूर्ण जगात देशाची मान पंतप्रधानांमुळे उंचावली आहे. आपल्याला जी २० परिषदेचं अध्यक्षपद मोदींमुळेच मिळालं. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला आहे, त्यांचा निषेध करावा तितका कमीय. मोदींच्या मातोश्रींचं निधन झालं त्यावेळी त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं. त्यांच्यामुळेच आपली अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर गेली, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.