मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी अखेर युरोपियन वैमानिक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई  - राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील विमान आणि हेलिकॉप्टरसाठी वैमानिकांचा शोध अखेर संपला आहे. राज्य सरकारने तीन वेळा निविदा काढूनही भारतीय वैमानिक न मिळाल्याने अखेर अधिक वेतनावर दोन युरोपियन वैमानिकांची नियुक्ती केली आहे. ते लवकरच राज्याच्या सेवेत रुजू होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात दोन विमाने आणि दोन हेलिकॉफ्टर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा जून 2017 मध्ये अपघात झाल्यानंतर वैमानिक संजय कर्वे आणि सहवैमानिक मोहीम शर्मा यांना चौकशीसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर नवीन वैमानिकांचा शोध सुरू झाला होता. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या. त्याला भारतीय वैमानिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. या वैमानिकांना सहा ते दहा लाखांचे वार्षिक वेतन देण्याची तयारी होती. अखेरीस हे पॅकेज 15 लाखांपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर युरोपियन वैमानिकांनी तयारी दर्शवली, अशी माहिती हवाई संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या दोन वैमानिकांना वार्षिक 30 लाखांचे वेतन देण्यात येणार आहे.

लवकरच सेवेत
भारतात काम करण्यासाठी परदेशी वैमानिकांना काही परीक्षा द्याव्या लागतात. त्यांना स्वतंत्र परवाना घ्यावा लागणार आहे. काही वैद्यकीय चाचण्याही त्यांना द्याव्या लागणार आहेत. या दोन्ही वैमानिकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. लवकरच ते राज्य सरकारच्या सेवेत रुजू होणार असल्याचे हवाई संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: chief minister helicopter european pilot