रखडलेल्या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - विविध कारणांमुळे रखडलेल्या राज्यातील दहा मोठ्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी (ता. २३) मुख्यमंत्री संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यात औरंगाबाद येथील समांतर जलवाहिनी प्रकल्पाचादेखील समावेश आहे. 

राज्यातील दहा मोठे प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले आहेत. त्यात पाणीपुरवठा, भूमिगत गटारसह इतर योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाने आपल्या वाट्याचा निधीही दिला आहे; मात्र हा निधी सध्या पडून असून, या योजनेत औरंगाबाद शहरातील समांतर जलवाहिनी व जालना येथील सीड पार्कसह इतर प्रकल्पांचा समावेश आहे. 

Web Title: Chief Minister initiative for laid down projects