सीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अत्याचार, दडपशाहीची, मराठी भाषेवरील अन्याय व मुस्कटदाबीची गंभीर दखल घेऊन सीमा भागातील मराठी जनतेला न्याय व महाराष्ट्रात सामील होण्याच्या त्यांच्या लढ्याला पाठिंबा व बळ द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी केली.

मुंडे यांनी आज मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेऊन मराठी सीमा भाषिकांचे प्रश्‍न, अडचणी, त्यांच्या समस्या व व्यथा व सरकारकडून त्यांच्या अपेक्षा व्यक्त करणारे तीन पानी सविस्तर पत्र दिले. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे होते.

महाराष्ट्र सरकारने तातडीने सीमा प्रश्नाच्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक आठ दिवसांत आयोजित करावी, एकीकरण समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात यावी, या संदर्भातील बैठका नियमित व्हाव्यात, सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळी राज्याचे मंत्री व सचिव दर्जाचे अधिकारी नियमित उपस्थित राहतील, याची निश्‍चिती करावी आदी मागण्या या पत्रात केल्या आहेत.

Web Title: Chief Minister should support the Border Fight Dhananjay Munde