शरद पवार आणि मुख्यमंत्री बारामतीत एकाच मंचावर; भाषणाकडे लक्ष

Politics
Politics

बारामती शहर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादीमध्ये आरोप - प्रत्यारोपांचे युद्ध रंगलेले असतानाच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थापरचंद गेहलोत यांच्यासमवेत मुख्यमंत्रीदेखील बारामतीत येणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री विराजमान होणार आहेत. त्यामुळे काय राजकीय जुगलबंदी रंगणार, या बाबत सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे. 

पुण्यात नुकत्याच झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा भाजपच जिंकणार, असे मुख्यमंत्र्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या देखत जाहीर केले होते. बारामतीची जागा कमळाच्या चिन्हावर लढविणार हे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर बारामतीच्या विद्यमान खासदार सुळे यांनीही त्यांना प्रतिआव्हान दिले. त्यामुळे व्यासपीठावर नेमकी काय जुगलबंदी होणार, याकडेच आता सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. 

हा कार्यक्रम केंद्र सरकारचा असला  तरी सुळे यांनी खासदार म्हणून वयोश्री योजनेंतर्गत केलेले काम देशातील कोणत्याही मतदारसंघापेक्षाही सरस ठरले आहे. त्यामुळे याबाबत भाजपचे मंत्री व मुख्यमंत्री काय वक्तव्य करतात, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com