मुख्यमंत्री, ठाकरे बंधू यांच्यासह प्रमुख नेते स्टार प्रचारक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबईसह दहा मोठ्या महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते स्टार प्रचारक म्हणून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. 

निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणते नेते प्रचार करणार आहेत या संदर्भात माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करणे राजकीय पक्षांना बंधनकारक आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांत स्टार प्रचारक ठरविण्याची प्रक्रिया सुरू असून, बडे नेते प्रचारात उतरवले जाणार आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि आमदार-खासदार असे 40 नेते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, रामदास कदम, एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आदेश बांदेकर, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह तब्बल 40 नेते प्रचार करणार आहेत. 

Web Title: Chief Minister, Thackeray brothers star campaigner