आज दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह, जनतेशी साधणार संवाद

आज दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह, जनतेशी साधणार संवाद

मुंबईः  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील. एकीकडे कोरोनाचं सावट आणि नाताळ, नववर्षाचं स्वागत यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर गेल्या ९ महिन्यांपासून सामान्य नागरिकांसाठी बंद असलेली मुंबईची लाईफलाइन लोकल सेवा सुरु करण्याची घोषणा करण्याचीही शक्यता आहे. 

दरम्यान येत्या नववर्षानिमित्तही काही नवे नियम जाहीर होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यातच कोरोनाचं सावट, मेट्रो कारशेड आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवरही मुख्यमंत्री काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

राज्यात सध्या एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय. त्यामुळे या सगळ्याचा विचार करुन काही मोठा निर्णय मुख्यमंत्री घेतील का आता हे जनतेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. 

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Chief Minister Uddhav Thackeray interact Social media one pm today 20 december

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com