प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट; 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा...

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 10 July 2020

राज्यात सध्या लिलाव पद्धतीने मच्छिमारी ठेके दिले जातात. ती लिलाव पद्धत बंद करण्यात यावी व थेट मच्छीमारांना ठेके देण्यात यावे. तसेच सुतार, कुंभार या समाजातील लोकांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत केली. 

मुंबई : राज्यात सध्या लिलाव पद्धतीने मच्छिमारी ठेके दिले जातात. ती लिलाव पद्धत बंद करण्यात यावी व थेट मच्छीमारांना ठेके देण्यात यावे. तसेच सुतार, कुंभार या समाजातील लोकांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत केली. 

ही बातमी वाचली का? ठाण्यातील लॉकडाऊन बाबत आली 'मोठी' बातमी, 'इतक्या' दिवसांसाठी वाढला ठाण्यातील लॉकडाऊन

प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (ता.10) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची "मातोश्री" या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. पक्षाचे उपाध्यक्ष धनराज वंजारी हे देखील यावेळी उपस्थित होते. राज्यात सध्या लिलाव पद्धतीने मच्छीमारी ठेके दिले जात आहेत. मात्र, मच्छीमार समाज हा गरीब असल्यामुळे त्यांना लिलाव प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही. त्यामुळे लिलाव पद्धत बंद करून ते सर्व ठेके मच्छीमारांना थेट देण्यात यावे. शिवाय मच्छिमारांच्या सहकारी संस्था आहेत. त्यांना मच्छिमारी करण्याचे अधिकार देण्यात यावे. सरकारचे असे केले तर पंचवीस ते तीस लाख मच्छीमार बांधव आहेत. त्यांचा आर्थिक प्रश्न सुटेल व त्यांना मदत करण्याची सरकारला गरज पडणार नाही. मच्छिमारी व्यवसायावर ते आपले पोट भरू शकतील व ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 

ही बातमी वाचली का? पालकांची चिंता मिटणार! पाल्य शाळेत न पोहचल्यास मोबाईलवर येणार अलर्ट..वाचा बातमी  

राजगृह हल्ला प्रकरणाचा तपास योग्य दिशेने 
सुतार, कुंभार यांचे आयुष्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उध्वस्त झाले आहे. त्यांना बॅंका मदत करायला तयार नाही. कुंभार, सुतार यांच्याकडे परवाने आहेत, त्यांना सरकारने 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे. त्यामुळे सरकारवर फार फार तर पंचवीस कोटी रुपयांचा बोजा पडेल. राज्यात सुमारे 17 लाख लोकसंख्या असलेला हा समाज असून सरकारच्या अनुदानामुळे ते त्यांच्या पायावर उभे राहतील. राजगृह हल्ला प्रकरणात योग्य तपास चालू असून, पोलीस आपल्या संपर्कात असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. 

ही बातमी वाचली का? ...म्हणून त्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करा; उच्च न्यायालयाचे निर्देश...

विकास दुबे प्रकरण चुकीच्या पद्धतीने झाले असून, त्याला टीप देणारे कोण वरिष्ठ अधिकारी होते. हे आता समजणार नाही, ती लिंक आता पूर्णपणे तुटली आहे, ही चकमक काहींना वाचवण्यासाठी होती. 
- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. 

--------------------------------

(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray-Prakash Ambedkar meeting; Discussions on important issues ...