उद्धव ठाकरेंचे भाषण बंडखोर शिंदेंसाठी ‘चकवा’? : जाणून घ्या पाच महत्त्वाचे मुद्दे

शिंदेंसोबत असलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या दुसऱ्या पिढीबद्दल फारशी चर्चा कुठेही झालेली नाही.
Chief Minister Uddhav Thackeray Shiv Sena leader Eknath Shinde
Chief Minister Uddhav Thackeray Shiv Sena leader Eknath Shinde Sakal

उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक होतंय. ठाकरेंनाही तेच अपेक्षित आहे. पण हा चकवा आहे, याची पूर्ण जाणीव एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या (काही) आमदारांनाही असणार आहे.

१) ठाकरेंनी आपल्या भाषणातून भाजपविरोध स्पष्ट केला. नेमकी याच्या विरुद्ध शिंदे आणि गटाची मागणी आहे. ठाकरे आपल्या जुळवाजुळवीच्या अनुभवातून बोलत राहिले. मात्र निवडणुकीच्या राजकारणात युती किंवा आघाडीचीच गणितं अधिक सोयीची आणि फायद्याची असतात याची जाणीव शिंदे गटाला दिसते.

२) शिंदेंसोबत असलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या दुसऱ्या पिढीबद्दल फारशी चर्चा कुठेही झालेली नाही. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीवेळी आदित्य यांनी राज्यभर आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी योगेश कदमसारखे दुसऱ्या पिढीचे नेते आदित्यसोबत होते. मात्र सत्तेत आल्यानंतर आदित्य यांनी नव्या टीमची बांधणी करायला सुरुवात केली आणि ही दुसरी फळी मागे पडत गेली. त्यांच्या पालकांना याची काळजी नसावी, असा समज म्हणजे भाबडेपणा आहे. आदित्य ठाकरेंसाठी प्रोटेक्टिव्ह असणारे ठाकरे आपल्या सहकाऱ्यांबद्दल नेमकं हेच दुर्लक्षित ठेवत आहेत, असं आतापर्यंत दिसतं.

Chief Minister Uddhav Thackeray Shiv Sena leader Eknath Shinde
Uddhav Thackeray : ‘रश्मी ठाकरेंच्या एंट्रीमुळेच शिवसेना अडचणीत’

३) ठाकरेंनी जनतेला भावनिक आवाहन करत कोरोना काळाची आठवण करून दिली. शिंदे आणि इतर सर्व आमदारांना (किमान ज्यांनी ग्राउंडवर काम केलंय) ग्राऊंड कनेक्ट आणि जनमत याची पर्वा याक्षणी नाही. याउलट हिंदुत्व हाच अनेकांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. याशिवाय शिवसेनेकडे फक्त चिन्हावर निवडून येतील असे पर्याय नाहीत, याचीही या फळीला जाणीव आहे. युती झाल्यास सर्वाना (आमदार आणि खासदार) भाजपचे अधिकचे बळही मिळते.

४) राहिला प्रश्न एकनाथ शिंदेंना व्हिलन बनविण्याचा. शिंदेंची खदखद अजित दादांसारखी impulsive असती तर त्यांनी धर्मवीर बनवून, रिलीज करून, हवं ते नरेटिव्ह सेट करून मग बंडखोरी करण्याची वाट बघितली नसती. नरेटिव्ह आणि आपली बाजू मांडण्याचा पुरेसा प्रयत्न त्यांनी यापूर्वीच केलाय.

Chief Minister Uddhav Thackeray Shiv Sena leader Eknath Shinde
छगन भुजबळ म्हणतात, 'निवडणुकीला तयार रहा' | Eknath Shinde

५) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार स्थापना हा आकड्यांचा - बहुमताचा खेळ आहे. त्यामुळेच आकड्यांचा अंदाज टप्प्यात आल्यानंतरच (विधानपरिषद निवडणूक निकाल आणि आगामी अधिवेशनात अध्यक्ष निवडणूक समोर ठेवून) या बंडाला आकार येतांना दिसला. ठाकरेंनी आज संदिग्ध भाषण करून वेळ मारून नेलीय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संख्याबळाच्या मर्यादा आणि प्रभाव स्पष्ट आहे. त्यांना बहुतेक वेळ हवाय. (ज्याला काही लोकं संयम असंही म्हणत आहेत) याच 'वेळे'चा उपयोग शिंदे आणि भाजपही करतंय, हे दुर्लक्षून चालणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com