सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील करणार : मुख्यमंत्री  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

मुंबई : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी "एमपीएससी'मार्फत निवड झालेल्या 833 विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे मुंडे म्हणाले. 

"एमपीएससी'मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडण्यात आलेल्या 833 उमेदवारांच्या भरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आल्याने महाराष्ट्र शासनाची 23 डिसेंबर 2016 ची अधिसूचना न्यायालयाने अमान्य केली होती. त्यामुळे निवड होऊनही या 833 उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे. याप्रकरणी सरकारने न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्यानेच या उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात होती. 

यासंदर्भात आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या "वर्षा' या निवासस्थानी भेट घेऊन या विद्यार्थ्यांचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले व याप्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयात चांगला वकील देऊन अपील केल्यास या विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो, त्यामुळे तातडीने सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. 

यांसदर्भातील मागणीच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश दिल्याचे मुंडे यांनी सांगितले.

Web Title: Chief Minister will appeal in the Supreme Court for Assistant Motor Vehicle Inspector Case