विमानसेवेबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी 

विमानसेवेबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी 

मुंबई - ‘अचानक लॉकडाउन जाहीर झाला पण, तो तसा अचानक उठवणार नाही,’ असे सूतावाच देणऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना देशांतर्गत विमाने सुरू करण्याआधी तयारी करायला हवे असे कळवले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देश्मुख यांनी रेड झोनमध्ये विमान वाहतूक सुरू करणे शक्य नसल्याचे ट्विट आधीच केले आहे. 

मुंबई सर्वाधिक बाधित असताना येथील विमानतळावर कामगार किती असतील? त्यांना सुविधा देता येतील का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या संबंधी आज केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी ठाकरे यांनी चर्चा केली. देशांतर्गत प्रवास सुरू करताना महाराष्ट्रात अनेक अडचणी आहेत. त्या लक्षात घेऊन पुढची पावले उचलली जातील असे ते म्हणाले. 

मुंबईत लोकलसेवा सुरू करणे हे मोठे आव्हान आहे, त्यामुळे फैलाव वाढू नये अशी ठाकरे यांची इच्छा आहे. महाराष्ट्राच्या अन्य भागातही कोरोनागस्ताची संख्या वाढते आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com