रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नाशिक : पंचवटी एक्सप्रेसला आदर्श एक्सप्रेस बनविणारे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांना नाशिक रोड रेल्वे स्थानकावरच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

पंचवटी एक्सप्रेसच्या नवीन डब्याची गाडी आजपासून सुरू झाली. तिच्या स्वागतासाठी गांधी रेल्वेस्थानकावर तयारीत व्यस्त होते. गाडी स्थानकात येण्यापूर्वीच ते रेल्वे स्थानकावर कोसळले. त्यांच्याच प्रयत्नामुळे आजपासून पंचवटी एक्सप्रेस नव्या स्वरूपात आदर्श एक्सप्रेस म्हणून सुरु झाली. त्यामुळे 2 दिवसापासून ते खूप धावपळीत होते.

Web Title: chief of rail parishad bipin gandhi expired