बालकांच्या पलायनात नागपूर पहिले

School
School

मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या (४७ टक्के) तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर (३३ टक्के) आहे. 

लोकलेखा समितीने २०१० ते २०१५ मधील राज्यभरातील बालसुधारगृहातील स्थितीचा अहवाल बुधवारी विधानसभेत सादर केला. समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी सभागृहात सांगितले की, समितीने एकूण परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. समितीने पुण्यासह नगर, लातूर, मुंबई शहर, नागपूर, परभणी, उस्मानाबाद आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांतील २५ बालगृहांची तपासणी केली. त्यातील ११ हजार ६६८ बालकांपैकी ५५८ बालके पळाल्याचे उघडकीस आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com