बालकामगारांच्या नशिबी मजुरीच

Child-Labour
Child-Labour

सोलापूर - राज्यातील पंधरा जिल्ह्यांमधील विशेष प्रशिक्षण केंद्रांमध्ये ५९ हजार ६०० बालकामगार असल्याचे बालकामगार आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. मागील सात-आठ वर्षांत नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील सुमारे एक लाखांहून अधिक बालकामगारांना या प्रकल्पांतर्गत दोन वर्षांचे विशेष प्रशिक्षण दिले; परंतु कुटुंबाची परिस्थिती बेताची, वडिलांचा मृत्यू अथवा आई-वडील दोघेही आजारी, उच्च शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्याने त्या मुलांच्या नशिबी पुन्हा मजुरीच येत असल्याचे चित्र पाहायला मिळते. 

कोणत्याही राज्यात अथवा देशात बालकामगार असणे, हे तेथील अर्थव्यवस्थेचे कुरूप लक्षण मानले जाते. डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना यासह अन्य योजनांच्या माध्यमातून बालकामगारांना न्याय मिळेल, अशी आशा होती; परंतु उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या नसलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेत बालकामगारांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे.

बालकामगार दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर पुढे काय करतो, यावर लक्ष ठेवणारी अथवा त्यांना कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात आणणारी स्वतंत्र व्यवस्थाच नसल्याने महाराष्ट्रात बालकामगारांची स्थिती ‘जैसे थे’च असल्याचे दिसून येते. अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये आजही ३० हजारांहून अधिक बालकामगार कार्यरत आहेत; परंतु भीतीपोटी कोणीही माहिती देत नाही. २०१५ ते २०१८ या कालावधीत मुंबईत सर्वाधिक २२३, तर रायगडमध्ये ४१, चंद्रपूरमध्ये आठ, ठाण्यात ३६, तर नाशिक, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नगर, गडचिरोली या जिल्ह्यांमधील २३९ बालकामगारांची टास्क फोर्सच्या धाडसत्राद्वारे मुक्‍तता करण्यात आली होती. तरीही बालकामगार कमी झालेले नाहीत.

सोलापुरात विडी व यंत्रमाग उद्योग मोठा असल्याने त्याठिकाणी दरवर्षी एक हजार बालकामगार आढळतात. ९ ते १४ वयोगटातील बालकामगारांना दोन वर्षांपर्यंत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर शिक्षणाच्या प्रवाहात आल्याचे समजले जाते. 
- अपर्णा बनसोडे, बालकामगार प्रकल्प अधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com