गुंटूर येथील मिरची होणार स्वस्त

महेंद्र बडदे
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - देशातील मिरचीची सर्वांत जास्त उत्पादन आणि आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या गुंटूर जिल्ह्यात यंदा मिरचीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत वाढलेल्या भावांत घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांत या गुंटूर येथील मिरचीची आवक होत असते.

पुणे - देशातील मिरचीची सर्वांत जास्त उत्पादन आणि आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या गुंटूर जिल्ह्यात यंदा मिरचीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत वाढलेल्या भावांत घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांत या गुंटूर येथील मिरचीची आवक होत असते.

मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुंटूर येथील ‘मिरची यार्ड’ (गुंटूर बाजार समिती) येथे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने अभ्यास दौरा आयोजित केला होता. या निमित्ताने मिरचीची बाजारपेठ, विक्री व्यवस्था, उत्पादन, प्रक्रिया उत्पादने आदीची माहिती तेथील प्रशासनाकडून मिळाली. समितीचे अध्यक्ष एम. सुब्बाराव, सचिव दिवाकर यांनी शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, समितीच्या पुढील योजनांचा आढावा घेतला. या वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे उपस्थित होते.

येथील बाजारात सध्या हंगाम सुरू होण्याचे वेध लागले आहे. साधारणपणे जानेवारी ते एप्रिल या महिन्यात मिरचीची आवक प्रचंड वाढेल. या कालावधीत बाजारात पुण्यातील बाजारपेठेत मिरचीची उलाढाल मोठी असून, यात ६० ते ७० टक्के वाटा गुंटूर येथील मिरचीचा आहे. शहरात नंदुरबार, खामगाव, वालसा आणि आंध्र प्रदेश (गुंटूर), कर्नाटक येथून मिरची येते. गेल्या तीन वर्षांत नंदुरबार येथे मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले होते. यंदा हवामानाने साथ दिल्याने चांगले उत्पादन झाले. गुंटूर येथील उत्पादन वाढले तर मिरचीचे भाव वीस टक्‍क्‍यापर्यंत कमी होऊ शकतात.

- बाळासाहेब कोयाळीकर, पुण्यातील व्यापारी

 

गुंटूर बाजार समितीची वैशिष्ट्ये

 ऑनलाइन लिलाव पद्धत सुरू

 बाजारात येणाऱ्या पोत्याला बारकोड

 लिलावात सहभागी प्रत्येक व्यापारी, खरेदीदाराला यूझर आयडी आणि पासवर्ड

 लिलावगृहातील संगणकात मालाची बोली नमूद करण्याचे बंधन

 मालाला मिळालेल्या किमतीची माहिती शेतकऱ्याच्या मोबाईलवर त्वरित उपलब्ध

 शंभराहून अधिक शीतगृहात मिरचीचा साठा, प्रत्येकी क्षमता एक ते दीड लाख गोणी 

 मिरची पावडरच्या सुमारे ६५ ते ७० मिल 

 ५० हजारांहून अधिक जणांना रोजगार

Web Title: Chili will be cheaper