चीनची अंतराळ प्रयोगशाळा महाराष्ट्रातही कोसळणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

असा असेल प्रवास
अरबी समुद्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्रात दाभोळ परिसरापासून ही प्रयोगशाळा भारतीय अवकाशात दाखल होईल. प्रयोगशाळा अडीच मिनिटाच्या कालावधीत पोलादपूर ते करंजावदरम्यान प्रवास करणार आहे. त्यापुढे मध्य प्रदेश आणि नंतर नेपाळ मार्गे तिबेटकडे ही प्रयोगशाळा मार्गक्रमण करेल. या कालावधीत उल्का वर्षाव पाहायला मिळणार आहे.

मुंबई : पृथ्वीच्या दिशेने झेपावणारी तियानगोंग-1 ही चीनची प्रयोगशाळा लवकरच पृथ्वीवर कोसळणार आहे. या प्रयोगशाळेसाठी वापरण्यात आलेल्या धातूवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे तो सर्वाधिक धोका समजला जात आहे. पृथ्वीच्या वातावरणात शिरताना या प्रयोगशाळेचे मोठे तीन ते चार तुकडे होतील, असा अंदाज आहे.

पृथ्वीच्या कक्षेत ही प्रयोगशाळा सध्या फिरत आहे; पण 22 हजार इतक्‍या मोठ्या प्रमाणावरील धातूच्या तुकड्यांमुळे जगभरातल्या सॅटेलाईट आणि अंतराळयानाला धोका आहे. अनेक छोटे धातूचे तुकडे ट्रॅक करता येणार नाहीत, हे सर्वांत मोठे आव्हान आहे. प्राथमिक अंदाजानुसार, अंतराळ प्रयोगशाळेचे 16 कोटी तुकडे हे पृथ्वीच्या सभोवताली फिरत राहतील, असा अंदाज आहे. त्यामुळे पृथ्वीसभोवतालचा भाग हा जंकयार्ड होईल, असे बोलले जात आहे.

कधी कोसळणार प्रयोगशाळा?
1 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 16 तासात ही प्रयोगशाळा कोसळणार आहे. प्रयोगशाळा 4 मिनिटे भारताच्या अवकाशातून मार्गक्रमण करेल. मध्यरात्री 2.46 ते 2.50 या कालावधीत ही प्रयोगशाळा भारतीय आकाशात दाखल होईल.

असा असेल प्रवास
अरबी समुद्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्रात दाभोळ परिसरापासून ही प्रयोगशाळा भारतीय अवकाशात दाखल होईल. प्रयोगशाळा अडीच मिनिटाच्या कालावधीत पोलादपूर ते करंजावदरम्यान प्रवास करणार आहे. त्यापुढे मध्य प्रदेश आणि नंतर नेपाळ मार्गे तिबेटकडे ही प्रयोगशाळा मार्गक्रमण करेल. या कालावधीत उल्का वर्षाव पाहायला मिळणार आहे.

तुम्हीही करा अंतराळ प्रयोगशाळा ट्रॅक 
http://www.aerospace.org/cords/reentry-predictions/tiangong-1-reentry/ या लिंकवर या प्रयोगशाळेचे ट्रॅकिंग करण शक्‍य आहे.

याआधी अंतराळयानाशी संबंधित घटना
1967- सोयुझ 1 या अंतराळयानाचा पॅराशूट न उघडल्यामुळे एका अंतराळवीराचा यामध्ये मृत्यू झाला.
1986- STS-51-L थंड वातावरणामुळे अवघ्या 73 सेकंदातच हे अंतराळयान भरकटले आणि मोठा स्फोट झाला. यामध्ये सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे अंतराळयानाचा अर्धा भाग आजतागायत सापडलेला नाही.
2003-04- कोलंबिया अंतराळयान दोन आठवड्याच्या मिशननंतर परतीच्या मार्गावर थर्मल प्रोटेक्‍शन सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. 

Web Title: Chinas Tiangong-1 space lab set to fall to Earth