बंडखोर राहुल कलाटेंच्या उमेदवारीवर शरद पवारांनी सोडलं मौन: Chinchwad Bypolls | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad Bypolls

Chinchwad Bypolls: बंडखोर राहुल कलाटेंच्या उमेदवारीवर शरद पवारांनी सोडलं मौन

चिंचवड पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेल्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार अशा चर्चेला उत आला आहे. अशातच मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत बंडखोर राहुल कलाटेंच्या उमेदवारीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या मनधरणीनंतरही राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने चिंचवड पोटनिवडणूक तिरंगी होणार आहे. या पोटनिवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष असलेल्या राहुल कलाटे यांच्यात सामना रंगणार आहे.

..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

दरम्यान, ही निवडणुक तीन चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाच शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी चिंचवड पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारसभा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चिंचवडमध्ये तिरंगी लढत होईल अशी चर्चा आहे असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला.

Thackeray Vs Shinde : …अन् सरन्यायाधीश धावून आले; सर्वोच्च न्यायालयात वाचून दाखवलं मराठी पत्र

त्यावर पवार म्हणाले, "माझा गेल्या 50-60 वर्षांतील निवडणुकांचा असा अनुभव आहे की, अशी ऐनवेळी उमेदवार दाखल केल्यानंतर त्यांची चर्चा होते, पण मतांच्या परिवर्तनामध्ये ते हळू हळू खाली जातात.

अर्ज भरल्याच्या दिवशी आणि त्यानंतर अपक्षाची चर्चेची हाईट होती, ती खाली मला दिसतेय. नुसतीच खाली नाही, तर ते नाव सुद्धा उमेदवारांमध्ये आहे की नाही अशा स्थितीत जाऊन पोहोचलं आहे. अशा शब्दात पवार यांनी अपक्ष उमेदवार कलाटे यांच्यावर भाष्य केलं.

तसेच, विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात आघाडीमध्ये विचारविनिमय झाला. चिंचवडची जागा राष्ट्रवादीने लढवावी असा निर्णय झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव हे संयुक्त कार्यक्रम घेणार आहेत. अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.

Sharad Pawar : मी कधीही पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जात नाही, पण...; पवारांनी सांगितलं कारण

यासोबतच, ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे. बाकी अन्य वेगळं चित्र इथे दिसेल, असं मला वाटतं नाही. शहराच्या विकासात आमच्या पक्षाच्या लोकांचा हात मोठा होता. पण, आम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही की, मागच्या वेळी लोकांनी आम्हाला बाजूला केलं. लोकशाहीमध्ये जे लोक सत्तेवर बसवतात, ते लोक सत्तेपासून बाजूलाही करतात", असं मत पवारांनी यावेळी व्यक्त केलं.

टॅग्स :Sharad Pawar