
Chitra Wagh : "उद्धवजी त्याच दिवशी मविआचा पोपट मेला…" अजित पवारांचा सोनार उल्लेख करत चित्रा वाघ यांची टीका
Chitra Wagh : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर आता राज्यातील राजकारण तापले आहे. शिंदे आणि उद्धव गटाच्या नेत्यांच्या एकमेकांबद्दलच्या प्रतिक्रिया पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाल्या आहेत.या सगळ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्यही समोर आले आहे. आता खर्या अर्थाने लढा सुरू झाल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आला आहे. आपला लढा जनतेसाठी असल्याचे ते म्हणाले. हा लढा देश आणि राज्यासाठी आहे.
तसेच न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचे ठाकरे गटाचे नेते म्हणत आहेत. न्यायालयाने देखील विधानसभा अध्यक्ष, राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे आम्ही पुन्हा ठाकरे यांना मुख्यमंत्री करु शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्यांवरुन उद्धव ठाकरे व विरोधकांवर टीका केली आहे. "उद्धव जी ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला. सुप्रीम कोर्टानं पण तेच सांगितलं. तुम्हाला कायद्याची भाषा समजत नसेल तर आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्युशन लावा, अशी खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांनी लगवाला आहे.
तसेच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता, असे अजित पवार म्हणाले होते. तसेच महाविकास आघाडीने लगेच नवीन अध्यक्ष बनवायला पाहिजे होते. असे झाले असते तर १६ आमदार अपात्र ठरले असते, असेही अजित पवार म्हणाले. यावरुन चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे.
सरकार पडण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा कांगावा करणाऱ्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलावं. नाना पटोले, उद्धव ठाकरे आता तुमचे कान सोनाराने (अजित पवार) टोचले, असे चित्रा वाघ म्हणाल्या.