कर्मचाऱ्यांचा संप मागे, मात्र नव्या वादाला फोडणी! चित्रा वाघ यांनी केली कारवाईची मागणी - Chitra Wagh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

Chitra Wagh : कर्मचाऱ्यांचा संप मागे, मात्र नव्या वादाला फोडणी! चित्रा वाघ यांनी केली कारवाईची मागणी

मुंबई : जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. ७ दिवस हा संप सुरू होता. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र आता नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एका महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण?, असा प्रश्न भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, संपातील १ महिला कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. आपल्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी संविधानाने दिलेले हत्यार आहे पण त्यात हे असं वक्तव्य एखादी “सटवी”च करू शकेल.

फेसबुकवर दुसऱ्याची पोस्ट शेअर केली म्हणून मागच्या सरकारने एका मुलीला थेट तुरूंगात पाठवले. इथे तर थेट हातात माईक घेऊन अपशब्द बोलले गेले हा देशाचे पंतप्रधान व राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का? पोलिसांनी स्युमोटो अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. 

चित्रा वाघ म्हणाल्या, सरकारी यंत्रणेतील हे राजकीय पाताळ षडयंत्री एकतर संघटनेने शोधून बाजूला सारावे नाहीतर राज्याच्या मुख्य सचिवांनी तरी त्यांना घरी बसवावे. आम्ही शोध घेतला तर सापडायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे!

टॅग्स :Chitra Wagh