'सकाळ'ची बातमी विधिमंडळात गाजणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

चोपडा, (नाशिक) - राज्यातील दहा विद्यापीठांत सहायक प्राध्यापकांची 844 पदे रिक्त आहेत. याबाबत "सकाळ'ने आज हे वृत्त प्रकाशित केले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज याची दखल घेतली आहे. विधिमंडळात उद्या (ता. 26) याबाबत आपण आवाज उठविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सुधारित आकृती बंधाच्या नावाखाली दोन वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या भरतीस बंदी आहे. राज्यभरात 1171 महाविद्यालयांतील 844 पदे रिक्त असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्राध्यापकांअभावी गुणवत्ता ढासळली आहे. स्पेशल विषयाचा प्राध्यापक महाविद्यालयात नसेल, तर तो विषय कुणी शिकवावा? त्या विषयाचे स्पेशलायझेशन नसेल, तर तो विषय शिकविला जात नाही, तरीही विद्यापीठ परीक्षा घेते म्हणजे विषय न शिकविता विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत नाही काय? असाही मुद्दा श्री. मुंडे उपस्थित करणार आहेत.

Web Title: chopada news sakal news vidhimandal dhananjay munde