औरंगाबाद तोडफोडीची सीआयडी चौकशी व्हावी : विनोद पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : औरंगाबादेत एमआयडीसी परिसरात करण्यात आलेल्या तोडफोडीची सीआयडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच मराठा आंदोलक तरुणांनी आत्महत्या करु नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

विनोद पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे : 

- मराठा आंदोलक तरुणांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची आमची विनंती.

- आंदोलनादरम्यान धरपकड झाली, त्यामध्ये आमचा कार्यकर्ता नाही.

- विनाकारण आम्हाला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न.

- 15 ऑगस्टपासून 'अन्नत्याग आंदोलन' आम्ही करणार आहोत.

- राष्ट्रगीत गाऊन याची सांगता केली. त्यानंतर एमआयडीसीमध्ये हा प्रकार झाला.

- याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी.

- ही तोडफोड उद्योगपतींची नसून, संपूर्ण शहराचीच तोडफोड आहे.

- पोलिसांबाबत बोलण्याचा आमचा अधिकार नाही.

- त्याबाबत पोलिसप्रमुखच सविस्तर बोलतील.

- आम्ही शांततेच्या मार्गाने जातोय.

- मराठा समाजाच्या या आंदोलनाला कोणीही गालबोट लावण्याचे काम करू नये.

- कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही.

- कालच्या घटनेचा आम्ही निषेध करतो.

- या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी आमची मागणी.

- आमचा या घटनेशी कोणताही संबंध नाही.

- कंपन्यांमधील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासावे.

- आम्ही चौकशीच्या मागणीवर ठाम.

- आंदोलकांनी आत्महत्या करू नयेत.

- ज्या आंदोलकांनी आत्महत्या केली, अशा आंदोलकांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी.

Web Title: CID inquiry should be done demanded Vinod Patil