२०२० मध्ये सिडकोचा गृहप्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सिडकोने घोषित केलेल्या सुमारे १५ हजार परवडणाऱ्या घरांचा प्रत्यक्ष ताबा २०२० मध्ये सदनिकाधारकांना मिळणार आहे. सिडकोने या घरांसाठी इमारती बांधण्याचे काम मे. बी. जी. शिर्के यांना दिले आहे. ३६ महिन्यांत ते हे काम पूर्ण करणार आहेत. मार्च २०२० पर्यंत अभियांत्रिकी विभागाला त्यांचे काम पूर्ण करायचे आहे. त्यांच्याकडून ऑक्‍टोबर २०२० पर्यंत सिडकोच्या पणन विभागाकडे घरांचा ताबा दिला जाणार आहे.

सध्या घोषित केलेल्या गृह योजनांच्या जागेवर इमारतींच्या पायाभरणीचे काम वेगात सुरू आहे. सिडकोने बांधलेली घरे पंतप्रधान आवास योजना व रेरा कायद्याच्या कक्षेत येत असल्यामुळे ही घरे नियोजित वेळेत पूर्ण करून ग्राहकांना देण्याचे बंधन सिडकोवर असल्याचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सिडकोने घोषणा केलेल्या महागृहनिर्माण योजनेतील इमारतींचे कळंबोली, खारघर, तळोजा, घणसोली व द्रोणागिरी या पाच नोडमध्ये ११ ठिकाणी काम सुरू आहे. कळंबोली येथे खड्डे खोदले असून, इमारतींच्या पायाचे काम सुरू झाले आहे. खारघरमधील प्रकल्पात पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून, वरील बांधकामाला सुरुवात झाली आहे. घणसोली येथेही पायाभरणीचे काम व बांधकाम सुरू आहे. द्रोणागिरी येथेही पायाभरणी व बांधकाम सुरू आहे. 

प्रकल्पांची ठिकाणे
तळोजा सेक्‍टर २७ - आसावरी गृहसंकुल
सेक्‍टर २१ - केदार गृहसंकुल 
सेक्‍टर २२ - धनश्री गृहसंकुल
खारघर सेक्‍टर ४० - बागेश्री गृहसंकुल
कळंबोली सेक्‍टर १५ - हंसध्वनी गृहसंकुल   
घणसोली सेक्‍टर १० 
भूखंड क्रमांक १ - मालकंस गृहसंकुल
भूखंड क्रमांक २ - मेघमल्हार गृहसंकुल
द्रोणागिरी सेक्‍टर ११ - मल्हार गृहसंकुल 
सेक्‍टर १२ - भुपाळी आणि भैरवी गृहसंकुल 

Web Title: CIDCO house in 2020