राज्यात चित्रपटगृहे ‘एक्झिट’च्या तयारीत!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फिल्म इंडस्ट्रीला काहीच दिलेले नाही. आम्ही अनेक वर्षांपासून मनोरंजन कर भरतो आहोत. पण ज्या वेळी आम्हाला गरज आहे, त्या वेळी सरकार मदत करायला तयार नाही.
- नितीन दातार, अध्यक्ष, सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्‍झिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया

पुणे - मनोरंजनाचे खात्रीशीर साधन असलेल्या चित्रपटगृहांनाही लॉकडाउनचा फटका बसला आहे. सुमारे ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने देशातील अनेक चित्रपटगृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र व राज्य सरकार अर्थव्यवस्थेला गती देण्याची भाषा करत असताना चित्रपटगृहे सुरू करण्याचा विचारही होत नाही. तसेच, या व्यवसायातील लोकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्नही होत नाही. याबाबत सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्‍झिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले, ‘‘चित्रपटगृहांबाबत सरकार का बाऊ करीत आहे. बस वाहतूक सुरू झाली. रेल्वे सुरू करण्याचा विचार केला जात आहे. तिथे लोक गेले, तर त्यांना कोरोना होणार नाही. केवळ चित्रपटगृहांमध्येच लोक गेले, तर त्यांना संसर्ग होईल, अशी परिस्थिती आहे का? त्यामुळे सर्व चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे. त्यास जेवढा उशीर होईल, तेवढा व्यवसाय उशिरा उभा राहील. थिएटर सुरू झाली नाहीत, तर निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळतील; मग चित्रपटगृहांनी काय करायचे? किमान कधी हा व्यवसाय सुरू करायचा याची तारीख 
निश्‍चित करावी.’’

Image may contain: text that says "७,५०० सुमारे देशातील थिएटर (एक पडदा मल्टिप्लेक्स) चित्रपटगृहात अशी घेऊ काळजी एकमेकांमधील अंतराचे पालन करू. चित्रपटादरम्यान मध्यंतर करणार नाही. गर्दी न होण्यासाठी कॅन्टीन बंद ठेवू प्रत्येक शो संपल्यानंतर सॅनिटायझेशन करू. ५०० महाराष्ट्रातील थिएटर (एक पडदा मल्टिप्लेक्स)"

ग्रामीण भागातील चित्रपटगृहचालकांसह कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा-पंधरा लाख रुपये लागणार आहेत. कारण, मालमत्ता करासह अन्य खर्च सुरूच आहेत. अनेक निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार आहेत. त्यासाठी चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी द्या, असे आवाहन दातार यांनी केले.

सोशल मीडियावर तरुणाईंकडून 'या'चा वापर वाढतोय, कोणत्या आहेत त्या गोष्टी, जरुर वाचाच...

देशातील एक पडदा आणि मल्टिप्लेक्‍स तीन महिन्यांपासून बंद आहेत. यातील अनेक मालक चित्रपटगृहे बंद करण्याच्या मानसिकतेत असल्याची खंत दातार यांनी व्यक्त केली. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cinemas in the maharashtra state are preparing for the exit