सर्कशीत प्राणीवापराविरुद्ध विद्यार्थ्यांचा एल्गार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - सर्कशीतील प्राण्यांच्या वापरावर निर्बंध असले तरी ते धुडकावले जात असल्याने याविरोधात मुंबई व ठाण्यातील शाळकरी विद्यार्थी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पोस्टरपत्रे पाठवणार आहेत. 

मुंबई - सर्कशीतील प्राण्यांच्या वापरावर निर्बंध असले तरी ते धुडकावले जात असल्याने याविरोधात मुंबई व ठाण्यातील शाळकरी विद्यार्थी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पोस्टरपत्रे पाठवणार आहेत. 

एण्ड सर्कस सफरिंग या जनजागृती कार्यक्रमांतर्गत प्राणिप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींचे एक पथकही मुंबई-ठाण्यातील शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम आखत आहे. त्यासाठी रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) व ठाणे एसपीसीए या प्राणिप्रेमी संस्थांनी फेडरेशन ऑफ ऍनिमल प्रोटेक्‍शन ऑर्गनायझेशन (फीआपो) या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना भूतदयेचे धडे देण्याबरोबरच सर्कशीत प्राण्यांचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यावर प्राणिप्रेमी स्वयंसेवकांचा भर आहे. त्यासाठी महिनाभरापासून नीरव शाह, परीन शाह, अमन शाह, यश शाह, दीक्षा शाह, अवनी कारिया यांची टीम पालिका आणि खासगी शाळांना भेटी देत आहे. मुंबई-ठाण्यातील सहा शाळांमध्ये आम्ही जनजागृती करत असल्याची माहिती रॉ या संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी दिली. 

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) 21 सर्कशींचा परवाना रद्द केला होता. प्राण्यांची योग्य देखभाल न करणे, या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली होती; परंतु सर्कशीतील प्राण्यांच्या वापरावर पूर्णतः बंदी यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे उपक्रम व्यवस्थापक प्रशांत आचार्य यांनी सांगितले. 

Web Title: Circus animals use for the students to elect