श्री स्वामी समर्थ यांचे वंशज असल्याचा दावा 

Claiming that Sri Swamy Samartha was a descendant
Claiming that Sri Swamy Samartha was a descendant

इंदापूर : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे खरे नाव चंचल भारती असून, ते मूळचे वडापुरी (ता. इंदापूर) येथील असून, त्यांचा थेट सातवा वंशज असल्याचा दावा वडापुरी येथील वैभव रतन गोसावी (भारती) यांनी सोलापूर दिवाणी न्यायालयात मंगळवारी (ता. 11) ऍड. हेमंत होळकर यांच्यामार्फत केला. 

या दाव्यात त्यांनी मुख्य सचिव, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर ट्रस्ट, गिरगाव मुंबई धार्मिक प्रकाशन संस्था 173 एफ, अनमोल प्रकाशन यांना प्रतिवादी केले आहे. प्रतिवादी 3 व 4 या प्रकाशन संस्थांनी अनुक्रमे स्वामी समर्थ महाराजांचे आद्य बखर, तसेच श्री स्वामी समर्थ हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ""ग्रंथात श्री स्वामी समर्थ महाराज जन्मशून्य होते. ते कर्दळीवनातून प्रकट झाले होते. ते संन्यासी व ब्रह्मचारी होते, असा लिहिलेला मजकूर खोटा आहे. या मजकुरामुळे स्वामी समर्थ महाराज, त्यांचे आईवडील, त्यांचे कुटुंब आणि वंशजांचा अवमान झाला,'' असे वैभव रतन गोसावी (भारती) यांचे म्हणणे आहे. 

वैभव रतन गोसावी (भारती) हे स्वामी समर्थ महाराज यांचे थेट वंशज असल्याचा जाहीर करावे, प्रतिवादींनी वादीच्या परवानगीशिवाय श्री स्वामी समर्थ महाराज यांचे नाव, मूर्ती व समाधीस्थळाचा वापर करू नये, यासाठी दाव्यात मनाई हुकूम मागितला आहे. या दाव्यात पुरावा म्हणून गोसावी यांनी मोडी लिपीतील पत्रे, वंशावळ, जमीन कागदपत्रे व पत्रव्यवहार सादर केले आहेत. सन 1917 मध्ये भगवान भारती यांचा तापसरी आजाराने मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा मुलगा भगवान आणि नातू इंगळाज यांनी सन 1917 मध्ये वडापुरी येथे मारुतीचे मंदिर बांधले. स्वामींचे वंशज सध्या पिठाची गिरणी चालवितात, तसेच शेतमजुरी करतात, असा दावा त्यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com