आठव्या ज्योतिर्लिंग मंदिरात राडा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

- मंदिरातील सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये झाला होता वाद

- वादाचे पर्यावसन झाले हाणामारीत.

हिंगोली : बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिरात भाविक व सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाली. दर्शनाला जाऊ देत नसल्याच्या कारणावरून ही शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले.

मंदिर परिसरात झालेल्या या हाणामारीनंतर जखमी भाविकांना उपचारासाठी औंढा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये हिंगोली शहरातील भाविक हे गंभीर जखमी झाल्याची माहिती औंढा पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिर परिसरात धाव घेत जखमी भाविकांना औंढा येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी भरती केले आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन अधिक तपास औंढा पोलिस करत आहेत.

दरम्यान, यापूर्वीही मंदिर प्रशासनाचा ढिसाळ कारभार
व औंढा नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष समोर आले होते. त्यानंतर आता ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clashes in Jyotirlinga Temple in Hingoli