मॉन्सूनसाठी वातावरण पोषक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon
मॉन्सूनसाठी वातावरण पोषक

मॉन्सूनसाठी वातावरण पोषक

पुणे - नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon) दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात येत्या रविवारपर्यंत (ता. १५) दाखल होण्यासाठी पोषक वातावरण (Conducive Climate) निर्माण होत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता. १२) दिला. सध्या बंगालच्या उपसागरात आलेले ‘असनी’ हे चक्रीवादळ निवळत असून, नैॡत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.

सध्या असनी चक्रीवादळ निवळत असले तरी याच्या अवशेषांमुळे आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी परिसरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे शुक्रवारी (ता. १३) आंध्र प्रदेश व परिसरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गेल्या महिन्यात १४ एप्रिल रोजी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या मॉन्सून हंगामात देशभरात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गेल्या वर्षी नैॡत्य मोसमी वारे २१ मे दरम्यान अंदमानात तर, ३ जून दरम्यान केरळमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर मॉन्सून ५ जूनला महाराष्ट्रात दाखल झाला.

मात्र, यंदा मॉन्‍सून येत्या रविवारपर्यंत (ता. १५) अंदमान समुद्रात दाखल होऊ शकतो. अद्याप हवामानशास्त्र विभागाद्वारे मॉन्‍सून हंगामाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात आलेला नाही. हा अंदाज जाहीर झाल्यास मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखा स्पष्ट होतील.

पुढील चार आठवड्यांचा पावसाचा अंदाज

  • १३ ते १९ मे - अंदमान समुद्रावर जोरदार पावसाची शक्यता

  • २० मे ते २ जून - अरबी समुद्रावरील वर्धित पावसाची शक्यता

  • २० मे पासून पुढे - दक्षिण द्वीपकल्प व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता

Web Title: Climate Is Conducive To The Monsoon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top