थंडी गायब; पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

नुकतीच कुठे थंडीची चाहूल लागली होती. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील तीन-चार दिवस थंडी गायब होणार आहे. वातावरण ढगाळ असणार असून, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे - नुकतीच कुठे थंडीची चाहूल लागली होती. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील तीन-चार दिवस थंडी गायब होणार आहे. वातावरण ढगाळ असणार असून, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

अरबी समुद्रात काही दिवसांपूर्वी ‘क्‍यार’ आणि ‘महा’ या चक्रीवादळांची निर्मिती झाली होती. राज्याच्या किनारपट्टीसह उर्वरित महाराष्ट्राला याचा फटका बसला होता. अरबी समुद्राच्या नैॡत्य भागात आता पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. वेधशाळेच्या माहितीनुसार पुढील ४८ तासांमध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्‍यता आहे. हे चक्रीवादळ पश्‍चिमी-वायव्य दिशेने सोमालियाकडे सरकण्याचा अंदाज आहे. त्याचा राज्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clod rain weather