#Mahaparikshaportal ‘महापरीक्षा पोर्टल’ बंदच करा; युवा आघाडीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
04.06 AM

‘एमपीएससी’द्वारे परीक्षेचा आग्रह
महापरीक्षा पोर्टलऐवजी वर्ग एक ते वर्ग चारच्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घ्याव्यात. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून घेतलेल्या परीक्षांची न्यायालयीन चौकशी करावी. तसेच पुढील सर्व परीक्षा स्थगित कराव्यात. लोकसेवा आयोगप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व परीक्षांचे शुल्क एकसमान करावे, अशी मागणीही केली.

तुमचे मत कळवा
महापरीक्षा पोर्टलवरील भरतीतील गैरव्यवहाराच्या आरोपाबाबत व परीक्षार्थींना होणाऱ्या मनस्तापाबद्दल तुम्हाला काय वाटते, हे कळवा. 
संपर्क - ९१३००८८४५९

पुणे - राज्य सरकारच्या अनेक विभागांची भरती प्रक्रिया ‘महापरीक्षा पोर्टल’च्या माध्यमातून होत आहे; परंतु, त्याद्वारे झालेल्या सर्व परीक्षांत अनागोंदी कारभार होत आहे. याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

लालबहादूर शास्त्री रस्ता येथे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. परीक्षार्थींच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला नाही. या सर्वांमागे गैरव्यवहाराची शक्‍यता आहे, हे लक्षात घेऊन तीन वर्षांपासून आप युवा आघाडी आणि इतर विद्यार्थी संघटना यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी लावून धरली होती. 

'इस्रो'च्या मोहिमांना मिळणार पुणे विद्यापीठाच्या संशोधकांची 'आण्विक' साथ!

सद्यःस्थितीत सत्तेतील पक्षाच्या नेत्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचे आश्वासन दिले होते. हेच आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी अनेक विद्यार्थी निदर्शनात सहभागी झाले.

युवा आघाडी शहराध्यक्ष महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, युवा आघाडी राज्य सहसंयोजक संदीप सोनवणे या सोबतच बजरंग लायगुडे, प्रवीण बहिर, प्रणित तावरे, योगेश इंगळे, जितेंद्र पोळ, राज अहिवळे, नझीम मुलानी, निखिल देवकर, मनेश जगताप आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close mahaexamination portal demand by yuvaaghadi