कमाल तापमानाचा पारा  ढगाळ वातावरणामुळे वाढला 

cloudy weather in pune
cloudy weather in pune

पुणे -  राज्यातील किमान तापमानाचा सर्वाधिक पारा लोहगाव आणि सांगलीमध्ये वाढल्याची नोंद हवामान खात्याने रविवारी सकाळी केली. त्यामुळे अर्धा नोव्हेंबर उलटला तरीही शहर आणि परिसरात अद्यापही थंडी जाणवली नाही.

पुण्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानाचा पारा 30.4 तर, किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. पुण्यात नोव्हेंबरमध्ये थंडीला सुरुवात होते; पण यंदा अद्यापही थंडी जाणवत नसल्याची चर्चा पुणेकरांमध्ये सुरू आहे. "वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे जम्मू, काश्‍मीरसह उत्तरेतील काही भागात पाऊस सुरू आहे. हिमवर्षावदेखील होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. 

पुण्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोचली नाहीत. त्यामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा 0.6 अंश सेल्सिअसने वाढून 30.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्याच्या किमान तापमानात 3.9 ने तर, लोहगाव येथील किमान तापमानामध्ये 4.6 अंश सेल्सिअसने वाढ झाली. पुण्यात किमान तापमान 18.2, तर लोहगाव येथे 19.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यात सांगली येथेही किमान तापमानात 4.6 अंश सेल्सिअस किमान तापमान वाढून 21.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. दरम्यान गोव्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला, असे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. 

गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे इराण व आसपासच्या भागांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झाले आहे. या डिस्टर्बन्समुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच येत्या 20 नोव्हेंबरपासून जम्मू काश्‍मीर आणि पश्‍चिमी हिमालयातील काही भागांमध्ये हलका पाऊस किंवा बर्फ पडण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची तसेच थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com