
Arvind Kejriwal : 'या नात्याला आम्ही पुढे नेऊ' ठाकरे भेटीत केजरीवालांचं सूतोवाच
मुंबईः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यानी आज 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तिनही नेत्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, उद्धव ठाकरे हे वाघाचा मुलगा आहेत. ते ही लढाई जिंकणारच. याशिवाय शिवसेनेची सुप्रीम कोर्टातील लढाई ठाकरेच जिंकतील, असंही केजरीवाल म्हणाले.
'उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि वरचेवर भेटू' असं म्हणून अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे आणि आपच्या नव्या नात्याचं सूतोवाच केलं आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल
उद्धव ठाकरेंनी मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात आणला ते कौतुकास्पद होतं
देशामध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई आहे. महागाई वरचेवर वाढतच आहे
केंद्र सरकार काही उद्योगपतींच्या भल्यासाठी देशाला वेठीस धरत आहे
आम्हांला एकमेकांच्या विरोधात लढायचं नाही तर सोबत मिळून काम करायचं आहे
या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि वरचेवर भेटत जावू
उद्धव ठाकरे वाघाचा मुलगा आहेत
गुंडागर्दीशिवाय भाजपला काहीही जमत नाही, यामुळे देश पुढे जाणार नाही
ईडी-सीबीआयचा वापर घाबरलेले लोक करतात
उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच न्याय मिळेल
महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे- भगवंत मान
देशाला मिळालेलं स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही
देशाला जगामध्ये एक नंबर बनवण्यासाठी काम करावं लागेल
सोन्याच्या चिमणीचे पंख कुणी उपटले, हे बघावं लागेल
आपल्याकडे समुद्र, तेल आणि नैसर्गिक संसाधनं आहेत
संसाधनांचा उपयोग योग्यरित्या केला तर देश पुढे जाईल