'हे' छत्रपतींचे मावळे होऊच शकत नाहीत - मुख्यमंत्री

रविवार, 22 जुलै 2018

मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बोलताना मात्र त्यांनी विरोधकांवर आणि काही संघटनांवर सडकून टीका केली आहे. वारीला अडथळा निर्माण करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाहीत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

सोलापूर - मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बोलताना मात्र त्यांनी विरोधकांवर आणि काही संघटनांवर सडकून टीका केली आहे. वारीला अडथळा निर्माण करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाहीत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

वारीमध्ये काही संघटनांचा चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा डाव होता असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायलय निर्णय घेऊ शकते. हे काही संघटनांना माहीत असूनसुद्धा काही संघटना राजकीय आकसापोटी समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. वारीत दगडफेक घडवून आणण्याचाही डाव आखण्यात आला होता. अशा प्रकारची हिंसक कामे करुन मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महाराष्ट्रात वारीची परंपरा ही 800 वर्षापासून आहे. शिवाजी महाराजांनीही वारीला संरक्षण दिलेले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची पुजा करावी ही परंपरा आहे. विठ्ठलाची पुजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, मी ती पोलिस संरक्षणातही ती केली जाऊ शकते. परंतु, यातून वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल म्हणून आपण पुजा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: cm devendra fadanvis criticise on maratha morcha protesters