Independence Day : गेल्या पाच वर्षात राज्याला सर्वच क्षेत्रात अग्रेसर केलं - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 August 2019

राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले त्यावेळी ते बोलत होते.

स्वातंत्र्यदिन
मुंबई : राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले त्यावेळी ते बोलत होते.

श्रीमती अमृता फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. औद्योगिक गुंतवणूकीमध्ये राज्य अग्रेसर असून देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवूणक एकट्या महाराष्ट्रात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या राज्यकारभाराच्या सूत्रानुसार कायम काम करत राहणार असल्याची ग्वाहीदेखिल त्यांनी दिली. प्रधानमंत्री यांनी दिलेल्या 'सबका साथ सबका विकास' आणि 'सबका विश्वास' त्रिसूत्रीच्या आधारावरच पुढील वाटचाल राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

देशाला 05 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य खंबीर पावले टाकत असून त्यामध्ये राज्याची 01 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवून आपला सहभाग नोंदविण्याचे प्रयत्न राहणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadanvis Independence day speech