पुन्हा सुरू होणार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचं पाणी ओसरलं असून परिस्थिती सर्वसामान्य होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा निवडणूक प्रचाराकडे वळवला आहे. २१ ऑगस्टपासून नंदूरबारमधून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे अशी माहिती महाजनादेश यात्रेचे नियोजन प्रमुख सुरजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीतील पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा अर्ध्यावर सोडत मुंबई गाठली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहेत. 

कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचं पाणी ओसरलं असून परिस्थिती सर्वसामान्य होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा निवडणूक प्रचाराकडे वळवला आहे. २१ ऑगस्टपासून नंदूरबारमधून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे अशी माहिती महाजनादेश यात्रेचे नियोजन प्रमुख सुरजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमधील भीषण पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ६ ऑगस्ट (मंगळवारी) महाजनादेश यात्रा अर्ध्यात सोडून मुंबईत परतले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ६ ऑगस्ट रोजी अकोल्यामधील सभेनंतर बुधवारी सकाळी बुलडाणा येथून महाजनादेश सुरू होणार होती. मात्र पूरसपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाजनादेश यात्रा स्थगित करत मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री आता लवकरच महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करणार आहेत. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जतनेशी संवाद साधण्यासाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavais Mahajanadesh Yatra starts again