Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दिवसभरात सभांचा धडाका

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दिवसभरात सभांचा धडाका

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नेतेमंडळींनी सभांचा धडाका सुरु केला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविध भागांचे दौरे केले. यामध्ये नांदेडमधील तीन ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या तर अमरावती, दक्षिण-पश्चिम नागपूर येथील प्रतापनगर आणि उत्तर नागपूर येथील कांजी हाऊस चौक येथे सभा झाली.

नांदेडच्या नायगाव येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. यामध्ये त्यांनी सातत्याने चुकीच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे नायगाव मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. रस्त्याच्या समस्या, बाभळी बंधारा, सिंचन समस्या, कृष्णुर येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह सगळ्या समस्या मिटवू. तुम्ही राजेश पवार यांच्या पाठीशी उभे रहा मी नायगाव विधानसभा मतदार संघाचं पालकत्व घ्यायला तयार आहे, असे वक्तव्य केले. 

त्यानंतर मुखेड येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील काही वर्षांपासून पडत असलेल्या अनियमित पावसामुळे मराठावाड्यात दूष्काळाची दाहकात निर्माण झाली आहे. कोकणात पडणारे पावसाचे पाणी वाहून समु्द्राला मिसळते यावर पर्यंत म्हणून काेकणातील 167 टीएमसी पाणी नदीजाेड प्रकल्पाच्या माध्यमातून गाेदावरीच्या खाे-यामध्ये साेडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, या पिढीने पाहिलेला दूष्काळ पुढच्या पिढीला दिसणार नाही. यासाठी भाजप उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com