जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस चालवतात बैलगाडी...(व्हिडिओ)

जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस चालवतात बैलगाडी...(व्हिडिओ)

खेड शिवापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपकडून राज्यभरात महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस चक्क बैलगाडी चालवताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल (शनिवार) पुणे शहरात आली होती. त्यानंतर आता ही यात्रा साताऱ्याच्या दिशेने जात आहे. असे असताना खेड-शिवापूर येथे ही यात्रा आली असताना मुख्यमंत्री फडणवीस चक्क बैलगाडीत बसून रॅलीत सहभागी झाले होते. त्यांनी बैलगाडा चालवलाही. त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही बैलगाडीवर होते. खुद्द मुख्यमंत्री बैलगाडी चालवत असल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. 

काल बसमध्ये अन् आज बैलगाडीवर

राज्यभरातील उर्वरीत टप्पे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरु आहे. पुण्यात आल्यावर 'महाजनादेश यात्रा' असे बॅनर असलेल्या बसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस दौरा करत होते. मात्र, आज ते बैलगाडीवर दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com