Loksabha 2019 : 'वर्षा'वर खलबते; नाराजांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 मार्च 2019

रवींद्र गायकवाड यांना न्याय देण्याचे बैठकीतील चर्चेत आश्वासन देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर राजेंद्र गावित, एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांची बैठक पार पडली. त्यात पालघरबाबत चर्चा झाली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाराज नेते खासदार रविंद्र गायकवाड यांची समजूत काढली असून, तर पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सोमवारी दुपारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी मध्यरात्री खासदार रवींद्र गायकवाड पोचले. बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उमरग्याचे आमदार ज्ञानेश्वर चौघुले, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे होते उपस्थित होते.

रवींद्र गायकवाड यांना न्याय देण्याचे बैठकीतील चर्चेत आश्वासन देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर राजेंद्र गावित, एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांची बैठक पार पडली. त्यात पालघरबाबत चर्चा झाली.

आज दुपारी 'मातोश्री'वर राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांच्यात भेट होणे अपेक्षित आहे. आज शिवसेनेकडून पालघर लोकसभा मतदार संघासाठी राजेंद्र गावित यांचे नाव घोषित होण्याची दाट शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना 'मातोश्री'वर बोलावून निर्णयाची कल्पना दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis meet Shivsena MP Ravindra Gaikwad in Mumbai