Vidhan Sabha 2019 : मुंबईत मुख्यमंत्र्यांचा मॉर्निंग वॉकद्वारे प्रचार

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज (रविवार) शेवटचा रविवार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट येथे मॉर्निंग वॉक करत प्रचार केला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, की स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि समर्थ भारत असा मोदींनी मंत्र दिला आहे. त्यामुळेच आम्ही सकाळी ताजी हवा घेण्यासाठी आलो आहेत. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही हे करत आहोत. आम्हाला विश्वास आहे, की नागरिक आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवतील.

भाजपने मुंबई चाले भाजपासोबत असे अभियान राबवून मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक सुरु केला. फडणवीस यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुलाबा विधानसभेचे उमेदवार राहुल नार्वेकरही उपस्थित होते. तर मुंबईतील अन्य भागातही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मॉर्निंग वॉक करत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांसोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com