भाजप हा शुद्ध रक्ताचा पक्ष: देवेंद्र फडणवीस 

शनिवार, 26 मे 2018

वसई : भाजप हा शुद्ध रक्ताचा पक्ष आहे. शिवसेना भाजपचे रक्त भेसळयुक्त म्हणते, वनगा हे भाजपचेच होते. वनगांच्या मनात कधीच भाजप सोडण्याचा विचार आला नाही. त्याग काय असतो याची शिवसेनेला कल्पना नाही. तुम्ही जिल्ह्यापुरते मर्यादीत आहात, आम्ही अखिल भारतीय आहोत, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोचला असून, शिवसेना आणि भाजपकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. वसईतील माणिकपूर येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

मुख्यमंत्री म्हणाले, ''खंजीर खुपसणाऱ्यांना वनगा यांच्या कुटुंबीयांना चिंतामन वनगा यांचा आत्मा माफ करणार नाही. निवडणुका येतच राहतात पण शिवसेना ज्या स्तरावर जात आहे हे पाहणे दुर्दैवी आहे. सज्जन शक्ती दुर्जन शक्तीचा नाश करते. उद्धव ठाकरे म्हणत आहेत पोलिस बाजूला ठेवून बघा काय होते, तसेच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणत होते. तुम्ही कोणत्या दिशने जात आहात. तुम्ही पोलिसांचे संरक्षण कशासाठी मागता. पोलिसांचा वापर आम्ही सत्तेसाठी कधीच केला नाही. जास्त संरक्षण घेऊन फिरणाऱ्यांनी विचार करावा. आम्ही विनासंरक्षण राज्यात फिरू शकतो. विनासंरक्षण फिरण्याची आजही ताकद आहे. बाळासाहेबांची शिवसेना होती, आताची शिवविरोधी सेना आहे. पाच वर्षे हे सरकार जात नाही, नंतरही आम्हीच येणार. वसईच्या हरित पट्ट्याला पूर्ण संरक्षण देऊ. आजचा दिवश शेवट म्हणून आम्ही काम करत आहोत.''

Web Title: CM Devendra Fadnavis replies to Uddhav Thackrays jibe