'इव्हीएम' बिघाडाचा फटका भाजपला जास्त बसला : मुख्यमंत्री

टीम ई सकाळ
गुरुवार, 31 मे 2018

''निवडणूक आयोग पूर्णपणे वेगळा आहे. निवडणूक आयोग निवडणुका घेत असते. तसेच इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यायला हवी. इव्हीएममध्ये झालेल्या बिघाडाचा फटका भाजपला जास्त बसला आहे''. 

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : काही भागात इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. त्यानंतर आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ''निवडणूक आयोग पूर्णपणे वेगळा आहे. निवडणूक आयोग निवडणुका घेत असते. तसेच इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यायला हवी. इव्हीएममध्ये झालेल्या बिघाडाचा फटका भाजपला जास्त बसला आहे''. 

पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे : -

- ही पोटनिवडणूक टाळता आली असती तर अतिशय आनंद झाला असता.

- सरकारमधील दोन पक्षांनी निवडणूक लढवावी का, हा प्रश्न आता पडत आहे.

- जे उमेदवार या निवडणुकीत लढले त्यांना नऊ महिन्यांसाठी खासदारची देण्यात आली आहे. नंतर त्यांना कोण तिकिटेही देणार नाही.

- इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे निवडणूक आयोगाने दखल घ्यायला हवी. याचा फटका आम्हाला जास्त बसला. 

- माध्यमांनी आम्हाला दोषी ठरले.

- निवडणूक आयोग पूर्णपणे वेगळा आहे. निवडणूक आयोग निवडणुका घेत असते.

- या सर्व प्रकाराची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली पाहिजे.

- मला विश्वास आहे, निवडणूक आयोग यावर कारवाई करेल.

- 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नक्कीच विजयी होईल. 

- भाजपने युतीला नकार दिला नाही. 

- परभणीची आमची जागा शिवसेनेला दिली.

- आमची युतीची तयारी, आमची अडचण नाही.

- युती एकतर्फी होऊ शकत नाही.

- त्यामुळे जे काही करायचे शिवसेनेला करायचे आहे. 

- भाजप शिवसेनेशी चर्चा करेल. 

- शिवसेना इतर कोणत्याही पक्षासोबत जाईल, असे मला वाटत नाही.

- जर इव्हीएममध्ये आम्ही फेरफार केला असेल तर काही ठिकाणी आमचा पराभव का झाला असता. 

- निवडणूक आयोगाने यावर गंभीर उपाययोजना करायला हव्यात.

- जिंकलो तर इव्हीएम चांगले आणि हरलो तर इव्हीएम खराब अशी स्थिती सध्या आहे.

- निवडणूक आयोगावर होत असलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर देणे गरजेचे आहे.

- आम्ही सेनेचा नेहमी सन्मान ठेवला.

- आमच्या पक्षामध्ये त्यांच्याबाबत भूमिका नेहमी स्पष्ट आहे.

- निवडणूक आयोग, पोलिस सर्व यंत्रणा सक्षम

- हरल्यानंतर हार स्वीकारायला हवी.

Web Title: CM devendra fadnavis says on EVM